esakal | ब्रेकिंग : नाशिकमध्ये भाजपाला खिंडार! गिते व बागुल आज करणार पक्षप्रवेश; मनपा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

sunil bagul, gite, raut.jpg

माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागुल आज(ता.८)  शिवसेनेत प्रवेश करणार आहे. या दोनही नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल रात्री या दोन नेत्यांनी नाशिक मध्ये खासदार संजय राऊत यांनी दोन तास प्रवेशा संदर्भात चर्चा केली

ब्रेकिंग : नाशिकमध्ये भाजपाला खिंडार! गिते व बागुल आज करणार पक्षप्रवेश; मनपा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागुल आज(ता.८)  शिवसेनेत प्रवेश करणार आहे. या दोनही नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल रात्री या दोन नेत्यांनी नाशिक मध्ये खासदार संजय राऊत यांनी दोन तास प्रवेशा संदर्भात चर्चा केली असून त्यांच्या प्रवेशाची आज राऊत पत्रकार परिषदेत घोषणा करणार आहेत.उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्री वर आज सायंकाळी ५ वाजता  प्रवेश करणार आहे

नाशिक मधील भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेच्या गळाला

त्यानतर सायंकाळी 6 वाजता वर्षा बंगल्यावर ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस हे तीन दिवसानंतर नाशिक दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्या या नियोजित दौऱ्यापूर्वी आज भाजपला धक्का बसला आहे.
सुनील बागुल आणि वसंत गीते दोनही नेते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून त्यांची घरवापसी होणार आहे.

हेही वाचा >  डोळ्यासमोर काळ अन् गळ्याभोवती बांधलेल्या स्टोलमुळे वाचली तरुणी; अंगावर काटा आणणारी घटना

मनपा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर गिते व बागूल या दोघांनीही शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला आहे. गिते यांनी स्वतःहून शिवसेना सोडत ते मनसे व भाजपमध्ये स्थायिक झाले होते, तर बागूल यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. पडतीच्या काळात दोघांचा शिवसेनेला झालेला उपद्रव लक्षात घेता त्यांना पक्षात स्थान दिले जाईल की नाही याबाबत साशंकता होती; परंतु आता शिवसेनेने पक्षवाढीसाठी धोरण बदलल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गिते व बागूल यांची घरवापसी करण्यास पक्षनेतृत्वाने हिरवा कंदील दिल्याचे बोलले जात आहे. गिते व बागूल या दोघांनीही बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याचे समजते. गुरुवारी दिवसभर गिते, बागूल यांचे मोबाईल स्विचऑफ होते. 

हेही वाचा > मैत्रीत मोठा घात! मित्राच्याच डोक्यात घातला मोठा दगड; नशेत सांगितली धक्कादायक आपबिती

loading image