नाशिक- ‘मविप्र’ संस्थेच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रातील क्षयरोग व छातीरोग विभागात ‘सीवायटीबी’ चाचणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाचे नुकतेच औपचारिक उद्घाटन झाले असून, अशा स्वरूपाची चाचणी उपलब्ध करणारे हे राज्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे.