Vasubaras
sakal
नाशिक: ‘दीन दीन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी’ म्हणत शुक्रवार (ता. १७) पासून दीपावलीच्या शुभपर्वास प्रारंभ झाला. वसूबारसचे औचित्य साधत सायंकाळी सार्वजनिक ठिकाणी, गोशाळांमध्ये गोमातेचे पूजन मोठ्या उत्साहात व श्रद्धापूर्वक करत गोमातेबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शहर परिसरातील विविध गोशाळांमध्ये गोमातेचे वासरासह पूजन करण्यासाठी अनेकांनी सहकुटंब हजेरी लावली.