Vat Purnima 2023 : वटपोर्णिमेनिमित्त भगवतीला आंब्यांची आरास; विलोभनीय दर्शनाने भाविक तृप्त

Vat purnima 2023 decoration of mangoes to goddess saptashrungi nashik news
Vat purnima 2023 decoration of mangoes to goddess saptashrungi nashik newsesakal

Vat Purnima 2023 : उन्हाळयाच्या सुट्टीचे अखेरचे काही दिवस शिल्लक असल्याने आध्यात्मिक पर्यटनासाठी राज्यभरातील पर्यटक, भाविकांची सध्या गडावर गर्दी वाढली आहे.

आद्य स्वंयभू शक्तिपीठातील आदिमायेच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ अधिक वाढू लागला आहे. दरम्यान आज वटपौर्णिमेनिमित्त सप्तशृंगगडावर भाविकांच्या दर्शनासाठी गर्दी उसळली होती. (Vat purnima 2023 decoration of mangoes to goddess saptashrungi nashik news)

उन्हाळ्याच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर हल्ली अध्यात्मिक पर्यटनाचा नवा फंडा सर्वांनाच प्रिय वाटू लागला आहे. मनोरंजनात्मक पर्यटन ठिकाणापेक्षा आध्यात्मिक ठिकाणची टूर तुलनेने स्वस्त, सहकुटुंब जाण्याजोगी व रोजच्या धकाधकीच्या जीवनात मनःशांती देणारी अशी असते.शिवाय अशा ठिकाणी सवलतीच्या दरात खूप छान सोय होत असते. त्यामुळे सर्वसामान्य पर्यटक व भाविक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भेटी देण्यात अग्रक्रम देत आहे.

सप्तशृंगीगडावर भाविकांबरोबरच पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. दहावी -बारावीचना निकाल लागल्याने पाल्य व पालकांवरील दडपण कमी झाल्याने पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची धावपळ सुरु होण्यापूर्वी धगाधगीच्या जीवनातून मुलांसोबत दोन दिवस बाहेर पडून मनशांतीसह पर्यटनाचा मिलाप असलेल्या सप्तशृंगगडावर गर्दी करीत आहे.

महिनाभरापासून उन्हाचा पारा वाढत असला तरी सकाळी बाराच्या आत त दुपारी तीन-चारनंतर दर्शनाचे नियोजन करीत गडावर दाखल होत आहे. त्यात सुट्टीचे शनिवार, रविवार तसेच नवसफेडीसाठी मंगळवार व शुक्रवारी या दिवशी गडावर नेहमीपेक्षा अधिक गर्दी होत असल्याने यात्रेचे स्वरुप प्राप्त होत आहे. त्यामुळे गडावरील अर्थकारणालाही गती मिळत आहे

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Vat purnima 2023 decoration of mangoes to goddess saptashrungi nashik news
11th Admission Process : अकरावी प्रवेशाची पहिली यादी 19 ला; अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रकिया या तारखेपासून

वटपौर्णिमेनिमित्त आज सकाळी ट्रस्टच्या कार्यालयातून भगवतीच्या सुवर्ण अलंकाराची मिरवणूक काढण्यात आली होती. सकाळी पंचामृत महापूजा दरम्यान श्री भगवतीस गुलाबी रंगाचे महावस्त्र नेसवून सोन्याचे अलंकार घालून साजशृंगार करण्यात आला होता.

गाभाऱ्यात फळांचा राजा असलेल्या आंब्याची पाने- डहाळीसह असलेल्या पिवळा, केशरी, लालसर आंबे तसेच हिरव्यागार कैऱ्यांची तसेच लाल पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या माळांसह आंब्याची केलेली झुंबर अशी मनमोहक आरास नाशिक येथील भाविक शंकर जुन्नरे यांनी केली होती.

यामुळे भाविक मंदिरात पोचताच आदिमायेचे तेजस्वी आश्वाषक रुप व हिरव्यागार पानाची शीतलता, आंब्याचा घमघमाटाने ते तृप्त होत होते. वटपौर्णिमेनिमित्त महिला वर्गाने वडाची पूजन झाल्यानंतर देवीदर्शनासाठी दुपारनंतर मोठी गर्दी केली होती.

Vat purnima 2023 decoration of mangoes to goddess saptashrungi nashik news
Sant Nivruttinath Palakhi : संत निवृत्तिनाथांच्या पालखीत 15 सदस्यीय आरोग्य पथक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com