Vedokt Controversy : समाज अजून किती दिवस वर्ण व्यवस्थेमध्येच राहणार? जितेंद्र आव्हाड यांची टीका

Former minister Jitendra Awad protesting with the constitution in his hands on Saturday regarding the Vedokta and Puranokta dispute at Srikalaram temple.
Former minister Jitendra Awad protesting with the constitution in his hands on Saturday regarding the Vedokta and Puranokta dispute at Srikalaram temple. esakal

नाशिक : कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी वेदोक्त पूजाविधी करावा. भारतीय संविधानाने सर्वांना एकसमान मानले आहे. वर्णव्यवस्था सर्वांसाठी घातक असून, समाज अजून किती दिवस वर्णव्यवस्थेतच राहणार आहे, असा प्रश्‍न माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awadh) यांनी शनिवारी (ता. १) श्रीकाळाराम मंदिरात केला. (vedokta controversy Jitendra Awadh criticism on society caste system nashik news)

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे यांना काळाराम मंदिरात वेदोक्त पद्धतीने पूजाविधी करण्यास रोखले असल्याची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती.

या पार्श्वभूमीवर आमदार आव्हाड यांनी डाव्या हाताला काळी फीत बांधून शनिवारी प्रसिद्ध काळाराम मंदिरात येऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. या वेळी तिरंगा झेंडा व भारतीय संविधानाची प्रत हाती घेऊन त्यांनी मंदिरात प्रवेश केला. वेदोक्त पूजाविधी सर्वांना एकसारख्या पद्धतीने लागू केल्यास भविष्यात अशा प्रकारचा वाद पुन्हा निर्माण होणार नसल्याचे आमदार आव्हाड यांनी सांगितले.

श्री. आव्हाड यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधत सांगितले, की ‘वसुधैव कुटुंबकम’ मानणारा मी धर्माभिमानी हिंदू आहे. वेदोक्त आणि पुराणोक्त यामुळे पुन्हा वर्णभेद वाद निर्माण होत आहेत. छत्रपती घराण्यास आजही अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Former minister Jitendra Awad protesting with the constitution in his hands on Saturday regarding the Vedokta and Puranokta dispute at Srikalaram temple.
Nagare Extortion case : नागरे खंडणी प्रकरणातील संशयितांवर मोका लावण्यास गृहमंत्रालयाचा नकार

अजून किती दिवस वर्णव्यवस्थेत समाज राहणार आहे, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी ब्राह्मणवृंद आणि त्यांचे धर्मपीठ यांनी विचार करून वर्णव्यवस्था मिटवून सर्व समाज एकसमान मानून त्यांना वेदोक्त पूजाविधी करण्याची मागणी केली. मंदिरात महंत उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. महंत उपस्थित असते, तर त्यांच्याकडून आमची बौद्धिक पातळी तपासून घेतली असती, असेही आव्हाड यांनी सांगितले. या वेळी त्यांनी सनातनींवर जोरदार शब्दात टीकाही केली.

अशी आहे नेमकी घटना

युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे काही दिवसांपूर्वी श्रीकाळाराम मंदिरात आल्या होत्या. या वेळी त्यांनी वेदोक्त पद्धतीने पूजा केली जात नसल्याने आक्षेप घेत पूजा करणाऱ्या महंतांना रोखत नाराजी व्यक्त केली होती.

या सर्व घटनेची पोस्ट संयोगिताराजे यांनी रामनवमीच्या दिवशी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. यानंतर महंत सुधीरदास पुजारी यांनी पत्रकार परिषद घेऊन गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली होती

Former minister Jitendra Awad protesting with the constitution in his hands on Saturday regarding the Vedokta and Puranokta dispute at Srikalaram temple.
Vedokt Controversy : महंत सुधीरदास यांनी स्पष्टपणे माफी मागावी : करण गायकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com