Namami Goda Project : नमामि गोदा प्रकल्पात भाजी बाजाराचा अडसर; स्वतंत्र नियोजनाच्या सूचना

godavari river
godavari riveresakal

Nashik News : शहरातून वाहणारी गोदावरी नदी पुनर्जीवित करण्यासाठी ‘नमामि गंगा’ प्रकल्पाच्या धर्तीवर ‘नमामि गोदा’ हा महत्वकांक्षी प्रकल्प राबविला जाणार असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार संस्था नियुक्त करण्यात आली आहे. (Vegetable market Obstacle in Namami Goda project nashik news)

प्रकल्पात सौंदर्यीकरणाचादेखील भाग असून सौंदर्यीकरणात भाजी बाजाराचा अडसर निर्माण होत आहे. त्यामुळे भाजी बाजार हटविण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गणेशवाडी रुग्णालयासमोरील अस्तित्वात असलेल्या भाजी बाजार इमारतींमध्ये विक्रेते स्थिरावण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या योजना आखण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नाशिक शहरातून गोदावरी नदीचा प्रवास १९ किलोमीटरचा आहे. गोदावरी नदी घाटावर दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असल्याने जगभरात धार्मिक महत्त्व आहे. दरवर्षी गोदावरीत स्नानासाठी लाखो भाविक येतात. परंतु गेल्या काही वर्षात कंपन्या व घरातून बाहेर पडणारे सांडपाण्याचे नाले नदीत मिसळत असल्याने प्रदूषण वाढले.

दरवर्षी गोदावरी स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्च केले जातात. परंतु उपयोग होत नाही. केंद्र सरकारने वाराणसीमध्ये नमामि गंगा प्रकल्प राबविला. त्यात नदी स्वच्छतेबरोबरच सौंदर्यीकरण करण्यात आले. त्याचं धर्तीवर नाशिकच्या गोदावरी नदीचे रूप पालटण्यासाठी नमामि गोदा प्रकल्प राबविला जाणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

godavari river
Mahavitaran Rate Hike : बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक! महावितरणकडून महागाईच्या आगीत तेल

सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अलमोंड या सल्लागार संस्थेला काम देण्यात आले आहे. सल्लागार संस्थेकडून अहवाल तयार करण्यात आला. आतापर्यंत तीस टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामाचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयात संस्थेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी भाजी बाजाराचा अडसर येणार असल्याची बाब प्रकर्षाने समोर आली.

नमामि गोदा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सौंदर्यीकरणाला भाजी बाजाराचा अडसर येणार आहे. अशावेळी सध्या अस्तित्वात असलेल्या भाजी बाजारात विक्रेत्यांना बसविण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. आयुर्वेद महाविद्यालयासमोरील तयार भाजी बाजाराच्या स्ट्रक्चरच्या बाजूने वाघाडी नाला वाहतो. तो नाला बंदीस्त करण्याबरोबरच तेथेही सौंदर्यीकरणाच्या सूचना देण्यात आल्या. साधारण जूनअखेर नमामि गोदा प्रकल्पाचा अहवाल तयार करून राज्य शासनामार्फत केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.

अस्तित्वातील बांधकामात बदल

२०१५ ला झालेल्या सिंहस्थात गोदावरी नदीवर कन्नमवार पूल ते तपोवन दरम्यान रामसृष्टी उद्यान उभारण्यात आले. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार नदी किनारी गॅबियन पद्धतीची भिंत बांधण्याच्या सूचना देण्यात आल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या उद्यानात फेरबदल होण्याची शक्यता आहे.

godavari river
SAKAL Exclusive : मागेल त्याला फळबाग, ठिबक, हरितगृह! शेतीसाठी साहित्य वेळेत मिळणार

स्वामिनारायण मंदिरासमोर चौपाटी

नमामि गोदा प्रकल्प साकारताना नागरिकांना मनोरंजनासाठीदेखील व्यवस्था केली जाणार आहे. या व्यवस्थेत नव्याने लोकार्पण करण्यात आलेल्या स्वामिनारायण मंदिरासमोरील नदीच्या उजव्या बाजूने कन्नमवार पूल ते सरस्वती पूल या दरम्यान गोदावरी स्वच्छता अबाधित राखताना चौपाटी करण्याचे नियोजन आहे. या दरम्यान गोदावरी नदी पात्रात बोटिंगची व्यवस्था केली जाणार आहे. यानिमित्त गोदाघाटावर होणारी गर्दीचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.

काय आहे प्रकल्पात?

- गोदावरी प्रदूषणमुक्ती.

- नदीत मिळणारे गटारींचे पाणी थांबविणार.

- नव्या गटारी टाकण्याबरोबरच जुन्या गटारींची दुरुस्ती.

- मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण व क्षमता वाढ.

- कारखान्यांच्या सांडपाण्याचा पुनर्वापर.

- गोदाघाट विकास व सौदर्यीकरण.

godavari river
Plastic Pollution : बॉयलर पेटतो प्लास्टिक कचऱ्याने! लखमापूर परिसरातील वास्तव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com