esakal | आवकेत घट होऊनही भाजीपाल्याचे दर स्थिर
sakal

बोलून बातमी शोधा

vegetables

आवकेत घट होऊनही भाजीपाल्याचे दर स्थिर

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (जि.नाशिक) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाजार समितीतील सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याची आवक रोडावली आहे. आवक कमी होऊनही मागणी नसल्याने पालेभाज्यांसह फळभाज्यांचे दर स्थिर राहिले. मात्र उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर काकडीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तिचे भाव कोसळल्याचे चित्र आहे.

आवकेत घट होऊनही भाजीपाल्याचे दर स्थिर

वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गत काही दिवसांपासून बाजार समितीतील सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. अर्थात पोलिस प्रशासन व समितीने आवारातील प्रवेशाबाबत काही बंधने घातल्याने समितीतील अनावश्‍यक गर्दीही काही प्रमाणात कमी झाली आहे. तसेच अनेकजण परिसरातच शेतीमालाची विक्री करत असल्याने त्याचा परिणाम आवकेवर झाल्याचे समितीच्या सूत्राने सांगितले.

काकडीची आवक वाढल्याने भाव घसरले

आज समितीत चारशे क्विंटल टोमॅटोची आवक झाली. त्याला कमाल अडीचशे तर किमान एक हजार ६२५ तर सरासरी हजार रुपये भाव मिळाला. याशिवाय वांगी १४० क्विंटल, कोबी ६५१ क्विंटल, ढोबळी मिरची ११८ क्विंटल, तर हिरव्या मिरची ३१ क्विंटल आवक झाली. मात्र उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर काकडीची मोठी आवक झाल्याने भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

भाव गत आठवड्यासारखेच

आज मुंबईसाठी ४७ ट्रक, गुजरातकडे १३, जळगाव- तीन, नगर- दोन, उत्तर प्रदेश- दोन, मध्य प्रदेश- दोन, तर अमरावतीकडे एक ट्रक माल रवाना करण्यात आला. केळी मार्केट सध्या बंद असल्याने आवक झाली नाही. कारली, गिलके, दोडके, भोपळा आदी वेलवर्गीय, तसेच मेथी, कोथिंबिर, शेपू आदी पालेभाज्यांच्याही आवकेत मोठी घट झाली. मात्र स्थानिक बाजारपेठेत मागणी नसल्याने भाव गत आठवड्यासारखेच स्थिर राहिले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीतील आवकेत मोठी घट झाली, मात्र मागणी नसल्याने भाव स्थिर राहिले. -अरुण काळे, सचिव, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

loading image
go to top