
Nashik News: भाजीपाला उत्पादक मेटाकुटीला; आवक प्रचंड वाढल्याने बाजारभाव गडगडले
खामखेडा : ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू असलेला पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिके घेतली. त्यामुळे सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमालीची वाढली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असले, तरी कमी का होईना पैसे मिळत असल्याने व्यापारी खुश आणि कमी भावामुळे ग्राहक आनंदी आहेत. जनावरांच्या चाऱ्यापेक्षाही भाजीपाला स्वस्त असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे.(Nashik News)
भाजीपाल्याचे दर सध्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दराचे गणित बदलले आहे. दोन आठवड्यांपूर्वी २० रुपयाला मिळणारी मेथी जुडी आता दहा रुपयांत दोन मिळत आहेत. पालकाचीही जुडीदेखील पाच रुपयांत मिळत आहे. (Vegetable producer upset Market prices tumble as inflows surged nashik news)
हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
हेही वाचा: Nashik News : थर्टीफर्स्टसाठी 7 लाख मद्यपींनी घेतले परवाने; नववर्षांसाठी 3 दिवसातील विक्रम
ग्रामीण भागातील आठवडे बाजारांमध्ये तर दहा रुपयांमध्ये मेथीच्या चार जुड्या मिळत आहेत. जनावरांना लागणारा हिरवा चारा महागडा, तर भाजीपाला अतिशय स्वस्त झाल्याचे चित्र सर्वत्र आहे. भाजीपाल्याचे दर कोसळत असल्याने गृहिणींचे बजेट सावरले असले, तरी शेंगदाणे, गोडेतेल, डाळी, तांदूळ, स्वयंपाकाचा गॅस आदींच्या किमती कमी होणे गरजेचे आहे.
स्वस्तात भाजीपाला मिळत असल्याचा काहीसा फटका व्यापाऱ्यांनाही बसत आहे. मात्र, काही व्यापारी चढ्या भावाने भाजीपाल्याची विक्री करून यातही पैसे कमावताना दिसतात. त्यामुळे भाजीपाला स्वस्त असला, तरी अशा व्यापाऱ्यांचा व्यवसाय जोरात आहे.
"यंदा पाणी मुबलक असल्याने मेथी, शेपू या भाजीपाला पिकांची लागवड केली होती. मात्र, भाव नसल्याने उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे."
-कैलास बच्छाव, शेतकरी, खामखेडा.
हेही वाचा: Solapur News: घाबरू नका, सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही! दररोज ८०० संशयितांचे टेस्टिंग