Nashik News : दराअभावी भाजीपाला रस्त्यावर; अस्मानी सुलतानी संकटाने बळीराजा हतबल

Watermelon thrown by Babaji Kakade.
Watermelon thrown by Babaji Kakade.esakal

बिजोरसे (जि. नाशिक) : कसमादे पट्ट्यात गेल्या महिन्यापासून भाजीपाल्याच्या दरात कमालीची घसरण सुरू झाली असून, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मेथी, मिरची, टरबूज, कोथिंबीर, कांद्यासह इतर पालेभाज्या व फळभाज्यांना कवडीमोल दर मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणेही मुश्किल झाले आहे.

साहजिकच कोसळत्या बाजारभावामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ‘भाव नाही शेतमालाला आणि उगीच दोष का नशिबाला’ असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे. (Vegetables on streets for lack of price farmer desperate because of crisis Nashik News)

शेतीच्या उत्पन्नावर मुलांचे लग्न, शिक्षण, आजारपण व इतर सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या भांडवलाची पुन्हा चिंता भेडसावत आहे. आर्थिक गणित चुकण्यामागे शेतमालाचे कोसळणारे बाजारभाव प्रमुख कारण आहे.

अवकाळी पावसाचा फटका बसला. असमानी सुलतानी संकट आणि पुरता हतबल होऊन शेतकरी आजपर्यंत नशिबाला दोष देत आला आहे. बळीराजा विचार करू लागला की शेतमाल चांगल्याप्रकारे पिकवतो. मात्र, भाव मिळत नाही. बियाणे, खते, औषधे, मजुरीचा खर्च निघणेही मुश्किल झाले आहे.

शेतकऱ्याने पिकवलेल्या कोणत्याच शेतमालाला भाव नाही. त्यातच पिकवलेला माल बाजारामध्ये नेला तर ग्राहक किंवा व्यापारी तोंडाला येईल तो दाम लावून शेतकऱ्यांची चेष्टा करू लागले आहेत. रूपया व दोन रुपये किलोपेक्षाही कमी भावाने भाजीपाल्याची मागणी होऊ लागल्याने शेतकरी आणि ग्राहक यांच्यात वाद होऊ लागले आहेत.

अलीकडच्या काळात शेती व्यवसाय जुगार ठरू लागला आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई, पावसाळ्यात अतिवृष्टी, हिवाळ्यात दाट धुके आणि रोगट हवामानाबरोबरच सर्वच ऋतूत वाढणारे विजेचे भारनियमन यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकरी शेतीत नवनवीन तंत्र वापरून पीके घेत आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Watermelon thrown by Babaji Kakade.
Nashik News | राजापूरच्या युवकांवरील गुन्हे मागे घेणार : फडणवीसांचे आमदार दराडेंना आश्‍वासन

यामुळे आधी खर्चाचा बोजा वाढत आहे. जीवापाड जतन करून पिकवलेल्या उभ्या पिकात नांगर फिरवण्याची वेळ येते. काळजावर फाळ घातल्यागत वेदना सहन कराव्या लागतात. शेतकऱ्यांची मुले चांगले उच्च शिक्षण कसे घेऊ शकेल, हा देखील प्रश्‍नच आहे.

"शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी सरकारला कधी पाझर फुटणार. कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला चांगल्या भावाची शाश्‍वती राहिलेली नाही. गेल्या चार- पाच वर्षापासून भाजीपाला पिकाला भाव मिळत नाही. आधीच पावसामुळे संपूर्ण पिकच वाया गेले. पिकवलेले टरबूज, फळे, पालेभाज्या उकिरड्यावर टाकण्याची नामुष्की ओढवली आहे. सरकारने हमी भाव द्यावा."- बाबाजी काकडे, शेतकरी, बिजोरसे

Watermelon thrown by Babaji Kakade.
Nashik News : येवला नगरपालिकेकडून 25 किलो प्लास्टिक जप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com