Vehicle
sakal
नाशिक: वाढते शहरीकरण व लोकसंख्येसोबत वाहनांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होत आहे. या वर्षी नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ८६ हजार ११८ नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वायुप्रदूषणाला हातभार लागत आहे. त्यामुळे भावी पिढीचे जीवन धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. हे चित्र बदलण्याची गरज आहे. त्यासाठी आठवड्यात किंवा महिन्यातील एक दिवस खासगी वाहनमुक्त दिवस साजरा करताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणे आवश्यक आहे.