पंचवटी- शहरासह जिल्ह्यात शेतीमाल व वाहनांची चोरी करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यास म्हसरूळ गुन्हे शोध पथकास यश आले. संशयितांकडून सोयाबीन, तांदूळ, गहू व महिंद्र कंपनीच्या तीन पिकअप, हिरो कंपनीची दुचाकी व दोन मोबाईल जप्त केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. याबाबत पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.