नाशिक- शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहनचोरट्यांचा अक्षरश: सुळसुळाट वाढला आहे. उपनगरीय परिसरातून सहा वाहने चोरीला गेली आहेत. वाहनचोरट्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी वाहने पार्क केल्यानंतर ते त्याच ठिकाणी मिळेल याची कोणतीही शाश्वती वाहनचालकांना राहिलेली नाही. वाहनचोरट्यांना बंदोबस्त करण्याची मागणी होत असून, पोलिसांकडूनही ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.