नाशिक- वक्फ कायद्याच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतली. या घटनेच्या निषेधार्थ विहिंपतर्फे शनिवारी (ता. १९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रशासनामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.