Nashik Crime News : दिवाळीत केलेल्या फायरिंगचा व्हिडिओ Social Mediaवर; एकाला अटक

Crime News
Crime Newsesakal

नाशिक : गेल्या ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचे फटाके फोडत असताना, ध्रुवनगर परिसरात एका परप्रांतियाने परवानाधारक पिस्तुलीतून हवेत फायरिंग केले. अनधिकृतरित्या फायरिंग केलेच, शिवाय ते करताना मोबाईलवर व्हिडिओही काढला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. सदरची बाब शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या लक्षात आल्याने पथकाने एकाला याप्रकरणी अटक केली आहे. (Video of Diwali firing on Social Media One arrested Nashik Crime News)

Crime News
Beed Crime News: सासुरवाडीत पत्नीची हत्या; पतीला जन्मठेप

आकाश संजय आदक (२४, रा. साईनाथ मंदिराजवळ, ध्रुवनगर, सातपुर-गंगापुर लिंकरोड, नाशिक) असे फायरिंग करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पोलीस अंमलदार प्रशांत मरकड यांच्या नजरेच सोशल मीडियावर व्हायरला झालेला व्हिडीओ आणि सदरील प्रकाराची माहिती मिळाली होती.

त्यांनी सदरील माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना दिली. त्यानुसार, संशयित आकाश आदक याने गेल्या दिवाळीत फायरिंग केल्याची खात्री झाल्यानंतर, गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने संशयित आकाशला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

त्यानेच दिवाळीच्या दिवशी फटाके फोडत असताना, त्याच्या नातलगाकडे परवाना असलेल्या पिस्तुलीतून हवेत फायरिंग केली. त्याचा मोबाईलवर व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे सांगितले.

त्याच्याकडून १ लाख ५० हजार रुपयांची पिस्तुल जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतरित्या फायरिंग केल्याचा व नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Crime News
Mumbai Crime News : नववीतील विद्यार्थ्याचा महिलेकडून लैंगिक छळ

सदरची कामगिरी आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, अंमलदार प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, नाझिम खान पठाण, आसिफ तांबोळी, विशाल देवरे, महेश साळुंके, मुक्तार शेख यांनी बजावली.

परवाना असला तरीही...

पिस्तुलीचा परवाना असला तरी तिचा वापर सार्वजनिक ठिकाणी स्वसंरक्षणा व्यतिरिक्त करता येत नाही. फायरिंग करायचीच असेल तर फायरिंग रेंजवर जाऊन ती करावी. नजिकच्या पोलिस ठाण्यास फायरिंगची आगाऊ कल्पना देऊन तशी परवानगीनंतर जंगलात वा निर्जणस्थळी फायरिंग करावी लागते.

संशयित परप्रांतिय

संशयित आकाश हा परप्रांतिय आहे. उत्तर भारतामध्ये लग्नसराईत, दिवाळी वा अन्य वेळी सहजरित्या फायरिंग केली जाते. अशी फायरिंग करणे त्यांच्या प्रदेशात क्षुल्लक मानले जाते. त्याच भ्रमात संशयित आकाश याने दिवाळीच्या दिवशी हवेत फायरिंग केली. मात्र, अशी फायरिंग करणे त्याला चांगलेच भोवले आहे.

Crime News
Crime News : 'तुला आज संपवतोय, असे म्हणत ,पत्नीच्या डोक्यावर कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com