नाशिक- राज्य शासनाने ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या दीर्घकालीन दृष्टिकोनावर आधारित व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्यास प्रारंभ केला असून त्यासाठी राज्यभरात व्यापक सर्वेक्षण सुरू आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी https://wa.link/o९३s९m या लिंकवर १७ जुलैपर्यंत सहभागी होऊन आपले मत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.