water supply
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पाणीपुरवठा योजनांचे सक्षमीकरण करण्यासाठी विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता दुप्पट अर्थात २७४ दशलक्ष लिटर केली जाणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काम मिळविण्यासाठी झालेल्या रस्सीखेचमध्ये जिंदाल (जेडब्ल्यूआयएल) कंपनीने पाच टक्के कमी दराने निविदा भरल्याने कंपनीला काम मिळणार आहे. साडेतीनशे कोटींचे काम असून, सिंहस्थापर्यंत काम झाल्यानंतर विल्होळी ते साधुग्रामपर्यंत थेट जलवाहिनी टाकली जाणार आहे.