Nashik News: आदिवासी लोकसंख्या गावासाठी ग्रामस्तरीय अभिसरणाची समिती

tribal community
tribal communityesakal

Nashik News : केंद्र सरकारने अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या गावासाठी आदर्श गाव संकल्पनेवर आधारित एकात्मिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी पंतप्रधान आदि आदर्श ग्राम योजना सुरु केली.

त्यासाठी राज्यात ग्रामस्तरीय अभिसरण समिती स्थापन करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला. (Village Level Convergence Committee for Tribal Population Village Nashik News)

tribal community
Nashik Crime: निवृत्त शिक्षकांच्या 29 लाखांवर कर्मचाऱ्याचा डल्ला; निफाड पंचायत समितीतील धक्कादायक प्रकार

सरपंच या समितीचे अध्यक्ष असतील. ग्रामपंचायतीमधील सर्व आदिवासी सदस्य, अंगणवाडी सेविका-सेवक, आशा सेविका, ए. एन. एम., पंचायत राज आणि सार्वजनिक बांधकामाची यंत्रणा, नरेगा योजनेत काम करणारे, शिक्षक, संबंधित विभागाचे प्रतिनिधी, ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवक, आवश्‍यकतेनुसार राज्यस्तरीय तांत्रिक सहाय्य संसाधन संस्थेचे प्रतिनिधी विशेष आमंत्रित यांचा समितीत समावेश असेल. एक आदिवासी सदस्य हे सचिव असतील.

समितीची तीन महिने अथवा आवश्‍यकतेनुसार बैठक होईल. गरजांचे सर्वेक्षण, माहितीचे संकलन, ग्रामविकास आराखडा तयार करणे, अंमलबजावणी करणे, मूल्यमापन आणि संनियंत्रण ही कामे समितीची असतील.

tribal community
SAKAL Exclusive: ‘मुक्‍त’मध्ये 4 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com