नाशिक : शिक्षकाच्या बदलीसाठी ग्रामस्थ आक्रमक

Nashik
Nashikesakal

न्यायडोंगरी (जि. नाशिक) : परधाडी येथील शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व मुख्याध्यापकांनी परधाडी येथील शाळेतील शिक्षक दिनेश पवार यांच्या बदलीबाबत लेखी व तोंडी तक्रार करूनही दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी (ता. २०) शाळेला कुलूप ठोकले. जोपर्यंत सदर शिक्षकाची बदली होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

नांदगाव तालुक्यातील परधाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून, तेथे ३११ विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे ९ शिक्षक कार्यरत आहेत. दरम्यान, संबंधित शिक्षक शासकीय कामकाजात दिरंगाई करत असू, वर्ग व्यवस्थित सांभाळत नाही. दैनंदिन टाचण न ठेवणे, वर्ग हजेरी न घेणे, वर्ग हजेरीवर मुख्याध्यापकाच्या सह्या न घेण्यासंदर्भात ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी लेखी स्वरूपात आले असल्याचे मुख्याध्यापक गवळी यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव, तक्रार अर्ज, ग्रामसभेचा ठराव व बदलीसंदर्भात सरपंच व समितीने वेळोवेळी केलेल्या अर्जाविषयी वरिष्ठ कार्यालयाला कळविल्यानंतर कुठलीच भूमिका घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर नांदगाव पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी नंदा ठोके यांनी शाळेला भेट देऊन ग्रामस्थांची बाजू समजावून घेतली. संबंधित शिक्षकाच्या बदलीचा अधिकार आपल्याला नसला तरी त्या शिक्षकाला काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आश्‍वासन श्रीमती ठोके यांनी दिले. मात्र, ग्रामस्थ व पालकांचे या निर्णयाबाबत समाधान झाले नाही. याप्रश्‍नी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला जाणार असल्याने याबाबत काय कार्यवाही होते, याकडे नांदगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Nashik
TATA कंपनीकडून नाशिक महापालिकेला मदतीचा हात


''परधाडी येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक दिनेश पवार यांचे जोपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशींचे दोन्ही डोस होत नाही व आरटीपीसीआर चाचणी होत नाही तोपर्यंत शालेय आवारात त्यांनी प्रवेश करू नये, असे आम्ही त्यांना पत्र देत आहोत. ग्रामस्थांनी त्यांच्या बदलीच्या केलेल्या मागणीचा अहवाल एकत्रित आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवत आहोत.'' - प्रमोद चिंचोले, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, नांदगाव

''परधाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दिनेश पवार यांच्याविषयी अनेक तक्रारी वरिष्ठांकडे दाखल केलेल्या आहेत. परंतु, अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. संबंधित शिक्षकाने कोविडच्या दोन्ही लस घेतलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता असून, आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत शिक्षकाची बदली होत नाही तोपर्यंत शाळा उघडणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.'' - उदय पवार, माजी सरपंच, परधाडी

Nashik
कमी पटसंख्येच्या शाळा सुरूच राहणार! कथित वृत्तावर पडदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com