विंचूर: फार्मर आयडी प्रक्रियेत गंभीर तांत्रिक त्रुटी समोर येत असल्याने शेतकऱ्यांचे काम अडचणीत आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या गट नोंदी चुकीच्या आधार क्रमांकाशी लिंक झाल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. सातबारा उताऱ्यावर गट एकाच शेतकऱ्याच्या नावावर असतानाही, त्या जमिनीची नोंद दुसऱ्या शेतकऱ्यांच्या ‘आधार’शी लिंक झाल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.