Crime News : त्रिमूर्ती चौकात सलग दुसऱ्या दिवशीही राडा
भरदुपारी युवकावर कोयता व चॉपरने वार केल्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाही, तोच बारसमोर मद्यपी टोळक्याने एका दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला.
नाशिक- त्रिमूर्ती चौकात मंगळवारी (ता.८) भरदुपारी युवकावर कोयता व चॉपरने वार केल्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाही, तोच याच परिसरात असलेल्या बारसमोर मद्यपी टोळक्याने एका दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याची प्रकार घडला.