K. C. From left Municipal Commissioner Chandrakant Pulkundwar, Police Commissioner Jayant Naiknaware, Rajendra More of Maharashtra Police Academy, Collector D. Gangatharan, Swami Samavidananda of Kailas Math etc.
K. C. From left Municipal Commissioner Chandrakant Pulkundwar, Police Commissioner Jayant Naiknaware, Rajendra More of Maharashtra Police Academy, Collector D. Gangatharan, Swami Samavidananda of Kailas Math etc.esakal

Nashik News : VIP अधिकाऱ्यांच्या हजेरीने गजबजला ब्रम्हगिरी परिसर

नाशिक रोड : ब्रह्मगिरी जेलरोड परिसरात १ नोव्हेंबरच्या सायंकाळी अचानक हायप्रोफाईल पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची गर्दी व लाल दिव्याच्या अनेक गाड्यांच्या ताफ्यामुळे परिसरातील नागरिक थोडावेळ संभ्रमात पडले. शाही मंडप, म्युझिक, गर्दी असे कुठेही नसताना मोठ्या संख्येने हे व्हीव्हीआयपी अधिकारी कुठे आले आहेत? अशी अनेकांच्या मनात चर्चा रंगली. त्यानंतर लक्षात आले ते म्हणजे गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक के. सी. पांडे व पोलीस महासंचालक (होमगार्ड) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचा नातू आणि धवल व रोशनी पांडे यांचा चिरंजीव निलाक्षच्या वाढदिवसानिमित्त घरगुती कार्यक्रमास अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची खास उपस्थिती लावली.

एरवी पोलीस दलाचे शहरात निरनिराळ्या भागामध्ये पेट्रोलिंग करत असतं. व्हीव्हीआयपी मंडळींच्या एकामागोमाग एक गाड्यांचे ताफे पाहून सुरुवातीस परिसरातील रहिवाशांना वाटले, की बहुदा पेट्रोलिंग सुरु असावे. पोलीस आयुक्तालय व नाशिक, ग्रामीण, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे प्रमुख त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांचीही वाहने एकापाठोपाठ एक परिसरात दाखल झाले. (VIP officials present in Brahmagiri area For Small birthday celebration Nashik News)

K. C. From left Municipal Commissioner Chandrakant Pulkundwar, Police Commissioner Jayant Naiknaware, Rajendra More of Maharashtra Police Academy, Collector D. Gangatharan, Swami Samavidananda of Kailas Math etc.
Farmers Request to CM Shinde : मुख्यमंत्रीसाहेब, शेतीला किमान दिवसा लाइट द्या हो!

त्यामुळे काहीवेळासाठी संपूर्ण परिसर खाकी वर्दी आणि अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे गजबजून गेला होता. ज्या घरगुती कार्यक्रमासाठी हे सर्व वरिष्ठ दाखल झाले तो कार्यक्रम मात्र अत्यंत साध्या व घरगुती वातावरणात कुठलाही गाजावाजा न करता साधेपणाने साजरा झाला.

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे संचालक राजेंद्र मोर, जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, पंकज भालेराव, सुनील बच्छाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, अनिल माने, गटविकास अधिकारी महेश पाटील, डॉ. प्रीतम आहेरराव, कैलास मठाचे स्वामी समविदानंद, रमेशचंद्र पांडे, क्लिफोर्ड इंटरनॅशनलचे के. एस. आजाद, बी. एम. सिक्युरिटीचे भुवाल सिंग, उद्योजक गोविंदा झा, ऑडिटर विष्णू वारुंगसे, अवनी बिल्डर्सचे संजय पांडे, शरद शिरोडे, संतोष सिंग, सुधा सिंग, घनःश्याम पाठक, अविनाश यादव, किरण डावरे, अमरनाथ पांडे यांनी हजेरी लावली.

K. C. From left Municipal Commissioner Chandrakant Pulkundwar, Police Commissioner Jayant Naiknaware, Rajendra More of Maharashtra Police Academy, Collector D. Gangatharan, Swami Samavidananda of Kailas Math etc.
SAKAL Exclusive : पारंपरिक गुंतवणुकीचा आर्थिक प्रगतीत अडसर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com