Viral Fever : साडेचार हजार रुग्णांची NMC रुग्णालयात नोंद

NMC Nashik news
NMC Nashik newsesakal

नाशिक : ऑगस्ट महिन्यात शहरांमध्ये ४४२४ व्हायरल तापाचे रुग्ण आढळून आल्याची बाब वैद्यकीय विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. अद्यापही अशा तापांचे रुग्ण आढळत असून अशा रुग्णांनी गर्दीत जाऊ नये असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
कोरोनानंतर आता स्वाईन फ्लू, चिकूनगुनिया, डेंगी व तापाच्या आजारांचे भीती निर्माण झाली आहे. (Viral Fever 4 half thousand patients registered in NMC hospital Nashik Latest Marathi News)

NMC Nashik news
ताहाराबाद ग्रामपंचायतीत गैरव्यवहार प्रकरण; सरपंच शीतल नंदन यांना अखेर अटक

या आजारांवर नियंत्रण ठेवत असताना आता शहरात व्हायरल तापाची साथ आल्याचे चित्र आहे. ऑगस्ट महिन्याचे प्राप्त झालेल्या अहवालानुसार ४४२४ वायरल तापाचे रुग्ण आढळून आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २०९ व्हायरल तापाचे रुग्ण आढळून आले. महापालिकेच्या रुग्णालयांची ही आकडेवारी असली तरी खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात व्हायरल तापाच्या आजारावर उपचार सुरू आहे.

ऑगस्ट अखेरपर्यंत डेंगी रुग्णांची संख्या १७२ होती. ऑगस्ट महिन्यात अतिसाराचे ९३६ तर विषमज्वाराचे २८ रुग्ण आढळले. दरम्यान, महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी व्हायरल तापाचे विश्लेषण करताना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. घसा खवखवणे, ताप खोकला, अंगदुखी अशा प्रकारची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांनी घराच्या बाहेर व विशेष करून गर्दीत जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

NMC Nashik news
Dhule : तलवारी नेणारे चौघे‍ गजाआड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com