अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!

malegaon quarantine.jpg
malegaon quarantine.jpg

नाशिक / डीजीपी नगर : मालेगावच्या कोरानाला हरवण्यासाठी क्वारंटाइन सेंटर मध्ये जणू आरोग्याचा मूलमंत्रच मिळाला आहे. याचा प्रत्यय तुम्हाला हा व्हिडिओ पाहून नक्की मिळेल. यामुळे मालेगावला नाव ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात जणू झणझणीत अंजनच घातले आहे ...


मालेगावचा आदर्श घेण्याची नाशिककरांवर वेळ
एकीकडे नाशिकमध्ये रोज पाचशे रुग्ण वाढत असतांना आता मालेगावचा आदर्श घेण्याची नाशिककरांवर वेळ आली आहे. येथील सर्वसामान्य जनतेच्या कल्पकतेने आयुर्वेदिक काढा आणि घरगुती उपायांनी कोरोना मालेगावातुन हद्दपार होण्याची घटिका समीप आल्याने मालेगावकरांचा हा आनंद आणि कोरोनाशी लढण्याची विल पावर बघून तरी आपल्याला हे चित्र स्पष्ट दिसत आहे.

कोरोना झाल्याचे दु:ख की आनंद?

मालेगाव येथील महात्मा गांधी विद्यामंदिरच्या एम एस जी कॉलेज ,मालेगाव कॅम्प येथील क्वारंटाइन सेंटरमधील कोरोना पेशंट नित्य नेमाने व्यायाम काढा, वाफ, आहार आणि त्यासोबत मनाला प्रसन्न करण्यासाठी संगीताच्या तालावर ठेका धरून कोरोनाच्या दुःखाला बाजूला ठेवून आनंदी आनंदाच्या वातावरणात कोरोनाचा सामना करून महाभयंकर संकटाचा सामना कसा करायचा याचा जणू आपल्याला आदर्श घालून देत आहेत..यावरून समजतच नाही की हे दु:ख आहे की आनंद का आणखी काही... 

रुग्णांचे मनोधैर्य आणि सकारात्मक ऊर्जा

मालेगावची आताची परिस्थिती पाहता येथीलकाही मोजक्या प्रमाणात असलेल्या कोराना पोझिटिव्ह रुग्णांचे मनोधैर्य आणि सकारात्मक ऊर्जा आणि आंतरिक आनंद बघून तरी जिल्यात आणि मालेगावचे कोरोना पेशंट नाशिकला आणू नका, असं म्हणत मालेगावला नाव ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच घातले आहे.

रिपोर्टर - संदीप पवार

(संंपादन - ज्योती देवरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com