Nashik : बांधकाम परवानगीसाठी आजपासून आभासी प्रणाली

NMC Building Permit
NMC Building Permitesakal

नाशिक : नवीन बांधकामासाठी (New Construction) प्रत्यक्ष उपस्थितीत (ऑफलाइन) प्रकरण दाखल करण्याची गुरुवारी (ता. ३०) अखरेची मुदत होती. शुक्रवार (ता. १) पासून बांधकाम परवानगी (Building Permits) ऑनलाइन (Online) होणार आहेत. अखेरचा दिवस असल्याने बांधकाम परवानगी प्रकरणे दाखल करण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागात (Municipal Town Planning Department) गर्दी होती. (Virtual system for building permits from today Nashik News)

प्रकरणे दाखल करण्यासाठी नगररचना विभागात अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने ३०० चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावरील बांधकामासाठी प्रत्यक्ष उपस्थितीत प्रकरणे सादर करण्यास मुदतवाढ दिली होती. आभासी पद्धतीने नवीन बांधकाम परवानगी देण्याच्या प्रक्रियेत संगणकीय त्रुटींमुळे परवानगी देताना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने महापालिकेने प्रत्यक्ष उपस्थितीत आणि आभासी असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले होते. शासनाने प्रत्यक्ष उपस्थित पद्धतीने विकसन परवानगीसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली. त्याअंतर्गत महापालिकेत बांधकाम परवानगी पूर्णत: प्रत्यक्ष उपस्थितीची केली गेलेली नव्हती.

NMC Building Permit
Nashik : स्वाईन फ्लू रुग्ण आढळल्याने मनपा सतर्क

सहाशे प्रस्ताव सादर

३०० चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडासाठी बांधकाम आणि भोगवटा परवानगी प्रस्ताव प्रत्यक्ष उपस्थितीत तर उर्वरित प्रस्ताव आभासी पद्धतीने स्वीकारण्याची मुभा देण्यात आली. प्रत्यक्ष उपस्थिती पद्धतीने प्रस्ताव सादर करण्याची मुदत गुरुवारी संपली. सुमारे तीन महिन्यात आभासी पद्धतीने सुमारे ६०० प्रकरणे दाखल झाली. त्यातील ३५७ प्रकरणांना आभासी पद्धतीने मंजुरी देण्यात आल्याचे महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले. उर्वरित प्रकरणे छाननी प्रक्रियेत आहेत. १ जुलैपासून सर्व क्षेत्रफळाच्या भूखंडासाठी बांधकाम आणि भोगवटा परवानगी प्रस्ताव तसेच भूखंडाचे एकत्रीकरण आणि उपविभाजनाचे प्रस्ताव आभासी पद्धतीने सादर करावे लागणार आहेत.

NMC Building Permit
Nashik : आमदाराने स्वतःला कोंडून घेत केलेली पूजा निष्फळ

"ऑनलाइन डीसीआर पद्धत चांगलीच आहे, मात्र त्यात अडचणी येऊ नयेत हीच अपेक्षा. सॉफ्टवेअर अडचणी येऊ नये. पूर्ण क्षमतेने कामकाज चालावे. तसे झाल्यास सगळ्यांची सोय होईल." - रसिक बोथरा, वस्तू विशारद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com