Crime News : नाशिक गोळीबार प्रकरण: भाजप नेत्याच्या निकटवर्तीयांना अटक; मुख्य संशयित अजय बागूल फरार
Arrests in Vise Mala Shooting Incident in Nashik : नाशिक येथील गोळीबार प्रकरणी शहर गुन्हे शाखेने भाजप नेते सुनील बागूल यांचे निकटवर्ती मामा राजवाडे आणि अमोल पाटील यांना अटक केली. या कारवाईमुळे गोळीबार प्रकरणातील राजकीय संबंधांवर लक्ष केंद्रित झाले असून, फरारी मुख्य संशयित अजय बागूलचा शोध पोलीस घेत आहेत.
नाशिक: विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी शहर गुन्हे शाखेने बागूल समर्थक मामा राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवार (ता. १३)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.