Vishwa Marathi Sammelan
sakal
नाशिक: ‘नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न’ म्हणीप्रमाणे शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाची अवस्था अशीच काहीशी झाली होती. अखेर या संमेलनाला कुसुमाग्रजांचा स्मृती दिन अर्थात मराठी भाषा गौरव दिनाचा मुहूर्त मिळाला असून, मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या प्रांगणात २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च असे सलग तीन दिवस हे संमेलन सारस्वतांच्या उपस्थितीत भरणार आहे.