Marathi Vishwa Sammelan
sakal
नाशिक: शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित चौथे मराठी विश्वसंमेलन येत्या २६ ते २८ डिसेंबरदरम्यान गंगापूर रोडवरील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या प्रांगणात होत आहे. मात्र संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना अजून ना आमंत्रण पत्रिका जाहीर, ना प्रमुख पाहुण्यांची निश्चिती, अशी ढिलाई दिसून येत असून, त्यावरून चर्चांना उधाण आले आहे.