Nashik Central Jail : नातेवाइकांच्या भेटीने बंदिवानांना बळ

A crowd of relatives outside the prison at Nashikroad
A crowd of relatives outside the prison at Nashikroadesakal

नाशिक रोड : प्रत्येकाची दिवाळी गोड, पवित्र व्हावी असा प्रयत्न कुटुंबीयांचे असतात. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात दिवाळीच्या सुटीमुळे बंदिवानांना भेटण्यासाठी नातेवाइकांची गर्दी होत आहे. बाकीच्या वेळी दिवसाला ६० ते ७० नातेवाईक भेटायला येतात. दिवाळीत हीच संख्या दुप्पट झाली आहे. आई, वडील, पत्नी, मुलांशी थोड्या वेळ झालेल्या प्रेमाच्या चर्चेमुळे, त्यांनी दिलेल्या दिवाळीच्या कपड्यांमुळे बंदिवानांना जगण्यास आत्मिक, शारीरिक, मानसिक बळ मिळत आहे. (Visit of relatives give strength to inmates at Nashik Central Jail Nashik News)

दिवाळी सणामुळे सर्वच कैदी सध्या सुखावल्याचा अनुभव त्यांच्या नातेवाइकांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत आहे. आयुष्यात क्षणिक झालेल्या चुकांची परतफेड करण्यासाठी कैदी शिक्षा भोगतात. सुधार आणि पुनर्वसन या तत्त्वाने कारागृह त्यांच्यासाठी नावीन्यपूर्ण योजना आणत असते. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात तीन हजारावर बंदी आहेत. त्यात शिक्षा सुनावलेल्या (पक्क्या) आणि खटल्याची सुनावणी सुरू असलेल्या (कच्च्या) बंदिवानांचा समावेश आहे. पक्क्या बंदिवानांना रोजगार देण्यासाठी नऊ छोटे कारखाने कारागृहात आहेत.

त्यात बेकरी, सुतारकाम, लोहारकाम, रसायन, मूर्तिकाम, चर्मोद्योग, विणकाम आदींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त कारागृहाची शंभर एकर शेती आहे. कारखाने व शेतीत बंदिवानांना काम दिले जाते. या कामाबद्दल कायद्यानुसार वेतन दिले जाते. दोन वेळचे भोजन, औषधोपचार, कॅन्टीन, व्यवसाय प्रशिक्षण, शिक्षणासह अनेक सोयी सुविधा दिल्या जातात, रजाही मिळते. नातेवाईकांशी फोनवर बोलून ताण कमी करण्यासाठी फोनची सुविधा आहे. ठरावीक दिवसांनी कारागृहाच्या आवारात प्रत्यक्ष पाहून बोलता येते. गळाभेटी सारख्या आगळ्यावेगळ्या उपक्रमात नातेवाइकांना बंदिवानांची गळाभेटही घेता येते.

A crowd of relatives outside the prison at Nashikroad
Damage Road : मनमाड- गिरणारे रस्त्याची चाळण; खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जडले आजार

नवीन कपडे, चप्पल देण्यासाठी गर्दी -

दिवाळीच्या काही दिवस आधी, दरम्यान आणि दिवाळीनंतरही बंदिवानांना नवीन कपडे, चप्पल देण्यासाठी नातेवाइकांची मोठी गर्दी होते. कपड्यांशिवाय दिवाळी फराळ व अन्य वस्तू देता येत नाही. कारागृहाच्या प्रवेशद्वारावरील कक्षात नातेवाइकांची नोंद करून भेटवस्तूंची तपासणी करण्यात येते. शिक्षा सुनावलेल्या पक्क्या कैद्यांना त्याचे नातेवाईक पंधरा दिवसातून एकदा तेही वीस मिनीटे भेटून बोलू शकतात.

कारागृहाच्या भेट कक्षात सुरक्षा रक्षकांच्या निगराणीखाली ही भेट होते. नाशिकबरोबरच मुंबई, औरंगाबाद, नगर, धुळे, जळगाव आदी राज्यभरातील जिल्ह्यातील बंदी नाशिक रोड कारागृहात आहेत. त्यांना या जिल्ह्यातून नातेवाईक भेटण्यास येतात. साश्रू नयनांनी निरोप घेऊन परत माघारी फिरतात. म्हणून दिवाळीच्या पवित्र सणाला कारागृहातील प्रत्येक कैदी पवित्र झाला पाहिजे, याचा प्रयत्न कारागृहातील अधिकारी व कर्मचारी करीत असतात.

A crowd of relatives outside the prison at Nashikroad
Nashik : पिंपळगावला आगारावर दिवाळी प्रसन्न!; लालपरी 10 दिवसात मालामाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com