esakal | इगतपुरीतील रिसॉर्टला 'ते' लग्न पडले महागात! अखेर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

vivant resort

'ते' लग्न इगतपुरीच्या रिसॉर्टला पडले महागात!

sakal_logo
By
गोपाळ शिंदे

इगतपुरी शहर (नाशिक) : मुंबई- नाशिक महामार्गावरील (mumbai-nashik highway) विवांत पंचतारांकित रिसॉर्ट येथे विवाह सोहळा (wedding ceremony) रविवारी (ता.३०) संपन्न झाला. पण तेच लग्न आता रिसॉर्ट व्यवस्थापनाला चांगलेच भारी पडले आहे. काय घडले नेमके? (Vivant-Resort-fined-for-break-of-rules-lockdown-nashik-marathi-news)

अखेर रिसॉर्टवर कारवाई

कोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत असताना स्थानिक प्रशासन डोळे झाक करताय की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. विशेष म्हणजे रविवार (ता.३०) मोठ्या प्रमाणात लग्नासाठी गर्दी झालेली होती. कारण सोहळ्यास शंभराहून अधिक वाहने येथे आली असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. असे असताना याची स्थानिक प्रशासनाला कुणकुण लागू नये, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, पत्रकारांनी बातमी संकलनासाठी प्रवेश मागितला असता प्रवेश नाकारण्यात आला होता. अखेर नियमांचे उल्लंघन केल्याने तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली तळेगाव शिवारातील खासगी विवांत रिसॉर्टवर कार्यवाही करण्यात आली.

नियम भंग प्रकरणी विवांत रिसॉर्टला दंड

सार्वजनिक कार्यक्रम व लग्न उत्सव साजरा न करण्याचे आदेश असताना विवांत रिसॉर्टवर शेकडोंच्या संख्येने नागरिक तपासणी दरम्यान आढळून आले. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने रिसॉर्ट मालक अवतारसिंग शेट्टी व व्यवस्थापक हुकूमचंद धामी यांच्याविरोधात कार्यवाही करण्यात आली आहे. संबंधितांना वीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी देखील विवांत रिसॉर्ट मालक यांना नियम भंग केल्याप्रकरणी नोटीस देण्यात आल्या असतानादेखील कायद्याचा धाक न बाळगता बिनबोभाट रिसॉर्टवर शेकडोंच्या संख्येने गर्दी करत कार्यक्रम सुरू होता. तहसीलदार परमेश्वर कासुळे, वरिष्ठ पोलिस अधिकारी नांगरे, मंडळ अधिकारी बनसोडे यांनी सदर कार्यवाही केली.

हेही वाचा: जीवघेण्या संकटावर हिमतीने मात! रुग्णालयाकडून दोघांचे बिल माफ

loading image