Vivek Watpade
sakal
नाशिक: उझबेकिस्तानमध्ये २० ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या आशिया कर्णबधिर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिकचा बुद्धिबळपटू विवेक वाटपाडे याची अधिकृत निवड झाली आहे. तो शुक्रवारी (ता. १९) भारतातून उझबेकिस्तानकडे रवाना होणार आहे. विवेकने याआधी मैसूर येथे झालेल्या राष्ट्रीय कर्णबधिर बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला होता. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावरच त्याची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.