Nashik News : ‘तो’ आवाज आर्मीतील ‘तोफची’चा नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

army canon

Nashik News : ‘तो’ आवाज आर्मीतील ‘तोफची’चा नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : शहर-परिसरामध्ये बुधवारी (ता. २५) सकाळपासून काही भीतीदायक आवाजांनी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, येत्या रविवारी (ता. २९) आर्मीच्या वतीने ‘तोफची’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच कार्यक्रमाचा सराव आर्मीकडून सुरू असून, त्याचाच तो आवाज असावा असे स्पष्ट केले आहे. (voice of canon of army creates fear among Nashik people Nashik News)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

बुधवारी (ता. २५) सकाळपासून ढगांच्या गडगडाटासदृश्‍य आवाज शहर परिसरात येत होते. दुपारपर्यंत असे आवाज शहरात ऐकायला होते. त्यातच ढगाळ वातावरण असल्याने काहींना तो ढगांच्या गडगडाटाचा आवाज वाटत होता.

दरम्यान, याबाबत जिल्हा प्रशासनाकडेही भूकंपासंदर्भात अनेकांची विचारणा केली. मात्र, ती शक्यता जिल्हा प्रशासनाने फेटाळली आहे. तर, सदरचा आवाज हा आर्मींच्या तोफा आणि लढाऊ विमानाचा असल्याचे सांगितले आहे.

येत्या रविवारी (ता. २९) आर्मींच्या वतीने ‘तोफची’ या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचा सराव आर्मीकडून केला जात असल्याने त्याचाच तो आवाज असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Nashikbomb blast