नाशिक: देवळाली विधानसभा मतदारसंघातील कथित मतदारवाढीचा मुद्दा देशात चर्चिला जात असताना जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांनंतर ९२ हजार २११ नवमतदारांची नोंदणी झाली आहे. दुसरीकडे ४० हजार ९९५ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीतून समोर आले. विशेष म्हणजे २० ते ३९ वयोगटात सर्वाधिक मतदार वाढले आहेत.