MUHS Election : आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरणासांठी आज मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MUHS latest marathi news

MUHS Election : आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरणासांठी आज मतदान

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी शुक्रवारी (ता. १७) होत असलेल्या निवडणूकीची तयारी पूर्ण झाली आहे. पात्र मतदारांनी मतदान करुन विद्यापीठाला सहाय्य करण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

निवडणूकीसाठी नियुक्‍त अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी शुभेच्छा दिल्या. (Voting today for MUHS Health Sciences University Authority Election nashik news)

विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ म्‍हणाले, की राज्यातील सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी साहित्यासह रवाना झाले आहेत. शुक्रवारी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत राज्यातील ४२ मतदान होईल.

९२ अधिकारी व कर्मचारी रवाना झाले असून, ८४ कर्मचाऱ्यांची केंद्रीय स्तरावर महाविद्यालयांमार्फत सेवा उपलब्ध करुन घेतली जाणार असल्याचे उपकुलसचिव महेंद्र कोठावदे यांनी सांगितले.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

निवडणुक कक्षाचे समन्वयक डॉ. संजय नेरकर म्‍हणाले, की विद्यापीठ प्राधिकरण निवडणूकीसाठी विद्यापीठात स्वतंत्र निवडणूक कक्ष कार्यान्वीत केला आहे. विद्यापीठातील विशेष कार्य अधिकारी राजेंद्र नाकवे, संजय कापडणीस, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, अविनाश सोनवणे, रंजीता देशमुख, शैलजा देसाई, मोहन सोळशे, आनंद जाधव, कृष्णा मार्कंड, संगीता जोशी, विशाल सोनवणे संयोजन करीत आहेत.

या अभ्यासमंडळाच्‍या निवडणूक स्‍थगीत

विद्यापीठाचे विधी अधिकारी अॅड. संदीप कुलकर्णी म्‍हणाले, की आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे प्राध्यापक वगळता शिक्षक आणि आयुर्वेद व युनानी अभ्यासमंडळातील युनानीकरीता निवडणूक न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगीत केली आहे. त्याचा कार्यक्रम नंतर जाहीर केला जाईल.