खराडीपाडा (ता. पेठ) येथील वृषाली भोये हिने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होताना खो-खोचे मैदान गाजविले आहे. स्वभावाने मितभाषी असलेल्या वृषालीची मैदानातील कामगिरी अव्वल राहिली आहे. खो-खो प्रबोधिनीच्या माध्यमातून तिने खेळ आणि शिक्षणात आपली छाप सोडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत सहभागी होऊन भारताला पदक जिंकून देण्याच्या धेयाकडे ती वाटचाल करते आहे.