Nashik News: वाघाडी पुलाचे कठडे ठरताहेत भुरट्यांचे ‘लक्ष्य’! कारवाईची गरज

Waghadi (Varuna) A bridge rendered dangerous by being mined for scrap iron in the abutments of the bridge.
Waghadi (Varuna) A bridge rendered dangerous by being mined for scrap iron in the abutments of the bridge.esakal

Nashik News : भुरट्या चोरट्यांकडून औरंगाबाद रोडवरील लोखंडी दुभाजकासह, विविध पुलांचे कठडे लक्ष्य होऊ लागले आहेत.

गणेशवाडीतून काळाराम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाघाडी नाल्यावरील पुलाचे कठडेही आता या चोरट्यांकडून गायब करण्यात आल्याने पुलाच्या मधोमध खिंडार पडून तो धोकादायक बनला आहे. (Waghadi bridge target of thieves Need for action Nashik News)

पंधरा- वीस रुपयांच्या लोखंडासाठी भुरटे चोरटे, गर्दुल्ले यांच्याकडून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड सुरू आहे. विशेष म्हणजे एखाद्याने या कामास अटकाव केल्यास थेट शिवीगाळ, मारहाण करण्यापर्यंत मजल जात असल्याने लक्षात येऊनही अनेकजण याकडे दुर्लक्ष करत आहेत.

विशेष म्हणजे या पुलाच्या समोरच माजी नगरसेवक उल्हास धनवटे यांचे निवासस्थान आहे. त्यांनीही अनेक वेळा या चोरट्यांना अटकाव केला. या पुलाच्या लोखंडी कठड्यामध्ये भक्कमपणासाठी स्टीलचा वापर केला जातो.

या स्टीलसाठीच हे कठडे तोडले जात आहे. विशेष म्हणजे अवघ्या पंधरा वीस रुपयांसाठी लाखो रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड सुरू आहे. मध्यंतरी टाळकुटेश्‍वर पुलावरील लोखंडी पाइप चोरट्यांनी लांबविल्याने त्या ठिकाणी दुसरा पाइप बसविण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Waghadi (Varuna) A bridge rendered dangerous by being mined for scrap iron in the abutments of the bridge.
Employment News : अल्पसंख्याक तरुणांना रोजगाराच्या संधी! या संस्थेमार्फत मिळणार कर्जरूपी निधी

बाजार समितीही लक्ष्य

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी गंगाघाटावरील भाजी बाजार हटविण्यात आला. त्यानंतर गणेशवाडीतील आयुर्वेद सेवा संघासमोर कोट्यवधी रुपये खर्च करून भाजी मंडई बांधण्यात आली.

परंतु बांधकाम झाल्यापासूनच वादग्रस्त ठरलेल्या या मंडईचा ताबा भिकारी, भुरट्या चोरट्यांनी घेतला आहे. येथील लोखंडी पाइप, दरवाजे, ओट्याला बसविण्यात आलेले स्टील चोरट्यांनी आधीच लंपास केले आहे. त्यातच नियमित सफाई नसल्याने या मंडईला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.

"गणेशवाडीतील भाजी मंडईतील अनेक वस्तू चोरट्यांनी लांबविल्या आहेत. आता त्यांचे लक्ष पुलाकडे गेले असून पुलांचे कठडे तोडून स्टील चोरून नेले जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे." - उल्हास धनवटे, माजी नगरसेवक

Waghadi (Varuna) A bridge rendered dangerous by being mined for scrap iron in the abutments of the bridge.
Nashik News: वाळूचा एक कणही घेऊ देणार नाही! भऊर, विठेवाडी, सावकी गावांचा एकमुखी निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com