वणी: रुग्णवाहिका केवळ रुग्णांच्या सेवेसाठी असताना, तिचा वापर थेट वैद्यकीय अधिकाऱ्याची नादुरुस्त दुचाकी दुरुस्तीला नेण्यासाठी आणि प्रवाशांच्या वाहतुकीसाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.