

Nashik Road Work Accident in Kolher Shivar Tractor Falls Into Deep Pit Teenager Dies and 18 Year Old Youth Seriously Injured
esakal
वणी (नाशिक) : रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याने एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना पिंपरी अंचला ते अहिवंतवाडी मार्गावरील कोल्हेर शिवारात शुक्रवारी (ता. ६) सकाळी घडली. रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात पंकज प्रकाश ठाकरे (वय १७, रा. अहिवंतवाडी) याचा मृत्यू झाला, तर ओंकार अशोक भुसार (वय १८) हा गंभीर जखमी झाला. ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.