Ravina Gaikwad
sakal
वणी: चौथ्या दक्षिण आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत (२०२५) वणीच्या सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील २१ वर्षीय रवीना विजय गायकवाड हिने प्रतिकूल परिस्थितीत दहा हजार मीटर अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. याद्वारे तिने भारताचा तिरंगा फडकावत देशासह नाशिक जिल्ह्यास बहुमान मिळवून दिला आहे.