Election
sakal
उपनगर: अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक १६ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. माजी महापौर अशोक दिवे यांचा सन २००२ मध्ये झालेला पराभव वगळता दिवे कुटुंबातील सदस्याने या प्रभागाचे महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे पक्षापेक्षा व्यक्तिसापेक्षतेवर येथील निवडणूक वळण घेते. एकदा शिवसेना व दुसऱ्यांदा भाजपकडून अनिल ताजनपुरे यांना येथील मतदारांनी निवडून दिले आहे. त्याव्यतिरिक्त प्रभागाला नवीन शिलेदार देण्याची परंपरा आहे.