Election
sakal
पंचवटी: विभागात टोकाला व बहुतांश ग्रामीण किनार असलेल्या या प्रभागात सत्तेची अनेक पदे मिळाली. परंतु, प्रभागाच्या विकासासाठी सत्तेचा उपयोग झाला नाही. समस्यांचे माहेरघर असे दुसरे नाव या प्रभागाला पडले आहे. अस्वच्छता, दुर्गंधी पाचवीला पुजले आहे. कॉलनी रस्ते, अस्वच्छता, पाणीटंचाई या मूलभूत समस्या ‘आ’ वासून आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये भाजपचे तीन तर मनसेचा एक उमेदवार निवडून आला.