Election
sakal
राजू अनमोला- सातपूर: उच्चभ्रू वसाहत, गंगापूर गाव आणि गावठाण परिसर यांचा विकासाचा ताळमेळ जुळून आणणे हे प्रभागाचे वैशिष्ट्य आहे; परंतु तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्यापासून प्रभागाचा विकास हरपला आहे. रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कॉलनीतील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ते या समस्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रस्त करीत आहेत. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी या प्रभागात शिवसेनेचे वर्चस्व दिसत आहे. मात्र, भाजप टक्कर देण्यासाठी समर्थपणे पुढे येण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक आठमध्ये विकासाची वाट लागली आहे.