MNS विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे इगतपुरीत जंगी स्वागत | Latest Marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Thackeray MNS Latest marathi news

MNS विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे इगतपुरीत जंगी स्वागत

इगतपुरी (जि. नाशिक) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने राज्यात महासंपर्क अभियान राबवले जात असुन या पाश्र्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा मनविसे पुनर्बांधनी दौऱ्यासाठी नाशिक जिल्हयाच्या दौऱ्यावर आले होते.

नाशिक जिल्हयाचे प्रवेशव्दार समजल्या जाणाऱ्या इगतपुरीत शनिवार प् ता.६ रोजी ) अमित ठाकरे यांचे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांनी ढोलताषाच्या गजरात जोरदार जंगी स्वागत केले. (warm welcome to MNS Vidyarthi Sena president Amit Thackeray in Igatpuri Nashik Political Latest Marathi news)

यावेळी एसएमबीटी महाविद्यालय, केपीजी महाविद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या बरोबर अमित ठाकरे यांनी संवाद साधला.यावेळी अमित ठाकरे यांनी कॉलेजच्या विद्यार्थीच्या अडी अडचणी समजुन घेत सवांद साधुन मार्गदर्शन केले.

हेही वाचा: शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थीनीची शाळेत गळफास घेत आत्महत्या

या प्रसंगी मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष संदीप किर्वे, तालुका अध्यक्ष शत्रूघ्न भागडे, मनविसेना गणेश उगले, मनसे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रताप जाखेरे, जिल्हा संघटक मनोज गोवर्धने, मुलचंद भगत, भोलेनाथ चव्हाण, इगतपुरी शहाराध्यक्ष सुमित बोधक, घोटी शहराध्यक्ष सत्यम काळे, इगतपुरी शहर उपाध्यक्ष राज जावरे, अमित किर्वे, निलेश बुधवारे, नागेश गायकर, यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा: विभागीय आयुक्तांच्या फोटोचा Social Mediaवर गैरवापर; 4 दिवसात दुसरा गुन्हा दाखल

Web Title: Warm Welcome To Mns Vidyarthi Sena President Amit Thackeray In Igatpuri Nashik Political Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikpoliticalmns