esakal | धक्कादायक! 'पाच लाख दे, अन्यथा नोकरीवरून काढून टाकू''; कुटुंबियांसह आमरण उपोषणाचा इशारा 
sakal

बोलून बातमी शोधा

bribary.jpg

संस्थेचे चेअरमन, सचिव, तज्ज्ञ संचालक व सदस्य पाच लाख रूपयांची मागणी करत असल्याचे रायते कुटुंबियांचे म्हणणे आहे. सध्या या कुटुंबियांना औषधोपचाराची गरज आहे. नेमके काय घडले वाचा...

धक्कादायक! 'पाच लाख दे, अन्यथा नोकरीवरून काढून टाकू''; कुटुंबियांसह आमरण उपोषणाचा इशारा 

sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक / पंचवटी : संस्थेचे चेअरमन, सचिव, तज्ज्ञ संचालक व सदस्य पाच लाख रूपयांची मागणी करत असल्याचे रायते कुटुंबियांचे म्हणणे आहे. सध्या या कुटुंबियांना औषधोपचाराची गरज आहे. नेमके काय घडले वाचा...

असा घडला प्रकार

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शांताराम तुकाराम रायते हे गत ३२ वर्षांपासून मातोरी चांदशी विविध कार्यकारी सोसायटीत कारकून म्हणून कार्यरत होते. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांच्याकडून सोसायटीचे सदस्य तुकाराम पिंगळे यांनी नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत तब्बल एक लाख दहा हजार रूपये लाच म्हणून घेतले. एवढ्यावरच न थांबता संबंधित सोसायटीचे चेअरमन आनंदा धोंगडे व इतरांनी ‘आम्‍हाला पाच लाख रूपये आणून दे, अन्यथा तूला नोकरीवरून काढून टाकू किंवा सक्तीच्या रजेवर पाठवू, अशी धमकी दिली. 

वेळोवेळी तक्रार अर्जही देण्यात आला..पण...

त्यानंतरही संबंधितांनी लाचेची रक्कम न दिल्याने बेकायदेशीरित्या सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्याकडील कारभार अन्य व्यक्तीकडे दिला आहे. याबाबत जिल्हा, तालुका उपनिबंधकांना वेळोवेळी तक्रार अर्जही देण्यात आला. मात्र यानंतरही संस्थेचे चेअरमन, सचिव, तज्ज्ञ संचालक व सदस्य पाच लाख रूपयांची मागणी करत असल्याचे रायते कुटुंबियांचे म्हणणे आहे. सद्या या कुटुंबियांना आषधोपचाराची गरज आहे, परंतु संस्थेचे पदाधिकारी पैसेही देत नसल्याने येत्या गुरूवारपासून (ता.२७) संस्थेच्या कार्यालयात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर शांताराम वामने यांच्यासह पत्नी सुनिता व मुलगा किरण वामने यांच्या स्वाक्ष-या आहेत. 

सहकुटुंब आमरण उपोषणाचा इशारा

पाच लाख रूपयांची लाच देत नसल्‍याने विविध कार्यकारी सोसायटीत कार्यरत असलेल्या एकाला कामावरून काढून टाकल्याची तक्रार आहे. सोसायटीच्या पदाधिका-यांनी संबंधिताविरोधातील कारवाई त्वरीत मागे न घेतल्यास येत्या गुरूवारपासून संस्थेच्या कार्यालयात सहकुटुंब आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. 

रिपोर्ट - दत्ता जाधव

संपादन - ज्योती देवरे

loading image
go to top