
नाशिक : कोरोना संक्रमणाची (corona virus) भयानक परिस्थिती आणि ती सांभाळताना राज्यशासनाच्या नाकी नऊ आले असून त्यात केंद्र सरकारच्या वतीने सुरू असलेल्या मोफत लसीकरणाचा (free vaccination) राज्य सरकारच्या (state government) अयोग्य नियोजनामुळे पुरता फज्जा उडाला आहे. राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राकडे बोट दाखवत आहे. केंद्राकडून लसींचा पुरवठा पण राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनाचा उत्तर महाराष्ट्रासह (north maharashtra) नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना फटका बसत असून नाशिकचे लसीकरण सुरुळित होण्यासाठी प्रसंगी मुंबईत आंदोलन करण्यात येईल असा इशारा खासदार डॉ. भारती पवार (dr.bharti pawar) यांनी दिला.
राज्याच्या ढिसाळ नियोजनामुळे लसीकरण संथ
कोरोना संक्रमणाची भयानक परिस्थिती आणि ती सांभाळताना राज्यशासनाच्या नाकी नऊ आले असून त्यात केंद्र सरकारच्या वतीने सुरू असलेल्या मोफत लसीकरणाचा राज्य सरकारच्या अयोग्य नियोजनामुळे पुरता फज्जा उडाला आहे. राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा स्पष्टपणे दिसत असून लस वाटपाचे नियोजन हे ठराविक भागास झुकते माप देण्याच्या राजकारणामुळे पुरते कोलमडले आहे. त्यामुळे नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या असंख्य केंद्रांवर लसपुरवठ्याचा जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केला जात आहे .त्याचा दोष हा केंद्र सरकारच्या माथी फोडला जात आहे. राज्य सरकार अपयश झाकण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवत असून लसिकरणासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे सूतोवाच केले होते पण घोषणा करून पंधरवाडा उलटून गेला असून ते फक्त एक आश्वासनच असल्याचे दिसून आले आहे.
लसीकरणासाठी मुंबईत आंदोलनाचा इशारा
केंद्र सरकारच्या नोंदींनुसार महाराष्ट्रास मिळणाऱ्या लसपुरवठ्यात कुठलाही भेदभाव केला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार राज्यात ८ मे पर्यंत एक कोटी ७९ लाख ७१ हजार ९९३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेअसून १० मे रोजी सकाळपर्यंत केंद्र सरकारकडून एक कोटी ८२ लाख ५२ हजार ४५० मात्रा उपलब्ध झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे आता ऐकून १० मे रोजी सकाळपर्यंत सात लाख १८ हजार ५६१ मात्रा राज्याच्या हाती असून एक लाख १३ हजार ३३० मात्रा अजून महाराष्ट्राला लवकरच मिळणार आहेत . शिवाय सुमारे दीड लाख मात्रांचा पुरवठा केंद्र सातत्याने राज्याला पुरवठा करत आहे. राज्य सरकारच्या नोंदीनुसार दररोज राज्यातील लसीकरणाची संख्या अडीच ते तीन लाख असेल, तर किमान आणखी तीन ते चार दिवस सर्व केंद्रांवर सध्याच्या क्षमतेने लसीकरण सुरळीत होण्यात कोणतीच अडचण नाही. असे असतानाही राज्यातील ठरावीक केंद्रे पूर्ण क्षमतेने लसीकरण करत आहेत, तर काही केंद्रांवर लसीचा खडखडाट आहे.
नाशिकला फज्जा
कोरोनाच्या विळख्यातील उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा देशभरात हॉटस्पॉट असूनही गलिच्छ राजकारणामुळे लसींचा पुरवठा केला जात नसून केवळ राजकारणापोटी ही जाणीवपूर्वक केली जाणारी टंचाई नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारी असल्याने ती ताबडतोब थांबवावी आणि वाटपाच्या नियोजनातील गोंधळ थांबवून लसीचे न्याय्य वाटप करावे अशी आमची मागणी आहे. २५ वर्षापुढील प्रत्येकास लस मिळावी अशी मागणी पंतप्रधानांकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. केंद्र सरकारने त्याही पुढे जाऊन, १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणाचा कार्यक्रम घोषित केला. त्यावर पंतप्रधानांचे आभार मानणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष कृतीची वेळ आल्यावर मात्र राजकारणाचा लपंडाव न खेळता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक सह प्रत्येक जिल्ह्यात लस ही उपलब्ध करून दिली जावी. जसे नासिक जिल्ह्याच्या रेमडीसीवर इंजेक्शन साठी मुबंई त भाजपा नेते व लोकप्रतिनिधींनी ठिय्या आंदोलन करून नाशिक साठी हक्काचे रेमडीसीवर पदरात पाडून घेतले असाआरोप करीत, नाशिकच्या सुरळित लसीकरणासाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.