नाशिककरांनो सतर्क राहा! पूराचा संभाव्य धोका, गोदाकाठच्या रहिवाश्यांना हलविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik godavari

नाशिककरांनो सतर्क राहा! गोदावरीत विसर्ग, पूराचा धोका

पंचवटी (नाशिक) : संततधारेमुळे गंगापूर धरणाच्या (gangapur dam) पातळीत मोठी वाढ झाली असून, धरणातून गोदावरीत (godavari river) विसर्ग करण्यात येत आहे. त्यानंतरही पाऊस सुरूच असल्याने नदीकाठावरील झोपड्या महापालिकेच्या पंचवटी विभाग आपत्ती व्यवस्थापन व निवारण कक्षाकडून हटविण्यात आल्या. या लोकांचे संत गाडगेबाबा धर्मशाळेत स्थलांतर करण्यात आले. पुराच्या शक्यतेने नदीकाठच्या सर्व रहिवासी व व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Warning-to-resident-due-to-risk-of-flooding-marathi-news-jpd93)

पुराचा धोका लक्षात घेत नदीकाठच्या व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा

पावसाने उसंत घेतलेली असली, तरी त्र्यंबकेश्वर भागात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे विसर्गानंतरही गंगापूर धरणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे गोदावरीला मोठ्या पुराची शक्यता आहे. तसेच नदीवरील लहान पूल व नदीलगतची घरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे रहिवासी व व्यावसायिकांना नाशिक महापालिका, पंचवटी पोलिस आणि जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून पंचवटी-रामकुंड व गोदाघाट परिसरात सर्वत्र ध्वनिप्रक्षेपकाद्वारे सावधानतेचा इशारा म्हणून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या गोदावरीला मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. पुराचा धोका लक्षात घेऊन महापालिका पंचवटी विभागीय अधिकारी प्रकाश निकम यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. ३१) नदीकाठावरील गौरी पटांगणातील व परिसरातील रहिवासी झोपड्या हटविण्यात आल्या.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात गुरुवारपासून ‘ज्याचा माल त्याचा हमाल’

हेही वाचा: कासव, विदेशी पोपटांच्या तस्करीचे रॅकेट! नांदगावला वनविभागाची कारवाई

Web Title: Warning To Resident Due To Risk Of Flooding Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top