Water Crisis : लाखो रुपये खर्चूनही मिटेना तहान; डॉक्टरवाडीतील 2 पेयजल योजनांवरील खर्च पाण्यात!

 water crisis
water crisisesakal

Water Crisis : डॉक्टरवाडी (ता. नांदगाव) येथील दोन पेयजल योजनांवर ५० लाखाहून अधिक खर्च झाला. पण तरीदेखील गावाला पिण्यासाठी पुरेसे पाणी अद्यापही उपलब्ध झालेले नाही. कालबाह्य झालेल्या ५६ खेडी योजनेचे पाणी तीस दिवसातून कधीतरी मिळत आहे.

पदाधिकाऱ्यांचे देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने ऐन उन्हाळ्यात गावच्या नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चूनही ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळणे महाग झाले आहे. (Water Crisis cost of 2 drinking water schemes in Doctorwadi fail nashik news)

डॉक्टरवाडी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी गावात ग्रामपंचायत मालकीची विहीर आहे. पण ग्रामस्थांना विहिरीचे पाणी घेता येत नाही. विहिरीवर जाण्याचा त्यांना अधिकार नाही. शिवाय विहिरीतून पाणी शेंदण्यासाठी व्यवस्था नाही.

२०१९ मध्ये ४० लाख खर्चून येथे राष्ट्रीय पेयजल योजना राबविली गेली. मात्र त्या योजनेचा गावाला लाभ मिळाला नाही. त्यानंतर १५ वित्त आयोगातून ९ लाखाची पेयजल योजना राबविली ती देखील वादात सापडली. २०१९ ते २०२२ पर्यंत दोन पेयजल योजना राबविल्यापण गावाला पाण्याचा थेंब मिळत नाही.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

 water crisis
Water Crisis : ऐन उन्हाळ्यात लांबले गिरणाचे आवर्तन! पाणीटंचाईची शक्यता

खासगी जागेत एका शेतकऱ्याने तत्त्वतः विहिरीसाठी दोन गुंठे जागा दिली. त्या जागेवर विहीरही खोदली व पाणीही लागले पण गत एक वर्षात या पेयजलचा लाभ लाभार्थींना मिळाला नाही. पाण्यासाठी नागरिकांना उन्हाळ्यात भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

"संमती पत्रावर विहिरीला जागा मिळाली आहे. आता वीज पुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पासाठी जागा पाहिजे आहे. जागेच्या मोबदल्यात पाणी व सोलरची वीज द्या अशी मागणी संबंधित करत आहे." - पवन थोरात, ग्रामसेवक.

 water crisis
Nashik News: अवकाळीमुळे लाल कांद्याचे बियाणे उत्पादन घटणार; जादादराने खरेदी करण्याची उत्पादकांवर वेळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com