नाशिक- जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ऐन उन्हाळ्यात महापालिकेने शनिवारी (ता. २२) शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला आणि रविवारी (ता. २३) कमी दाबाने पाणी आल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप झाला. सलग दोन दिवसांच्या पाणीबाणीमुळे पंचवटी, सिडको, नाशिक रोड, जुने नाशिकसह इंदिरानगर, सातपूर भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. खासगी टँकरचालकांनी मागणीनुसार ‘वेटिंग लिस्ट’ तयार केली, तर ज्यांना टँकरने पाणी घेणे शक्य झाले नाही, अशा महिला, मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. शहराच्या वेगवेगळ्या भागांतील पाण्याच्या परिस्थितीचा घेतलेला आढावा...