Arrested
Arrestedesakal

Nashik Crime: शोरुममधून पाण्याची मोटार चोरणारा अटकेत; सर्व्हिंसिंगच्या वाहनातून चोरायचा स्पेअरपार्ट

Nashik Crime : नाशिक-पुणे महामार्गावरील आराध्य सुझुकी शोरुममधून पाण्याची मोटार चोरी करणाऱ्या संशयिताला उपनगर पोलिसांनी जळगावमधून अटक केली.

दरम्यान, संशयित हा त्याच शोरुममध्ये कामाला असताना सर्व्हिंसिंगसाठी येणाऱ्या वाहनांचे स्पेअरपार्ट चोरी करीत असल्याचीही कबुली दिली आहे. (Water motor stolen from showroom arrested spare part to steal from servicing vehicle Nashik Crime)

मोईन उर्फ मोनू फिरोज शहा (२२, सध्या रा. अमरधाम रोड, नानावली, जुने नाशिक. मूळ रा. मेहरून रोड, जळगाव) असे संशयिताचे नाव आहे. उपनगर पोलिस ठाण्यात शोरुममधील पाण्याची मोटार चोरीप्रकरणी गुन्हा दाखल होता.

याप्रकरणी गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व पथक तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या माहितीच्या आधारे पथकाने संशयित मोईन यास जळगावातून अटक केली.

त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, यापूर्वीही त्याने अशारितीने गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Arrested
Crime News: धक्कादायक! इंस्टाग्राम मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार

दरम्यान संशयित मोईन हा आराध्य शोरुममध्ये कामाला असताना, त्याने साथीदार राजेश जाधव व जफर खान यांच्या मदतीने शोरुममध्ये सर्व्हिंसिंगसाठी येणाऱ्या वाहनांचे नवीन स्पेअर पार्ट काढून त्याठिकाणी जुने स्पेअर पार्ट लावत.

अशारितीने ते वाहनांच्या स्पेअरपार्टची चोरी करीत असल्याचेही तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी संशयिताला न्यायालयात हजर केले असता, त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदरची कामगिरी उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विनोद लखन, पंकज कर्पे, हिवाळे, गवळी, लोंढे यांनी बजावली.

Arrested
Nashik Crime News : मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास 20 वर्षे कारावास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com