बागलाणमधील 104 गावांचा पाणीप्रश्‍न मिटणार; PM Jal Jeevan Mission योजनेंतर्गत 125 कोटी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jal Jeevan Mission

बागलाणमधील 104 गावांचा पाणीप्रश्‍न मिटणार; PM Jal Jeevan Mission योजनेंतर्गत 125 कोटी मंजूर

सटाणा (जि. नाशिक) : पंतप्रधान जलजीवन मिशन योजनेंतर्गत बागलाण विधासभा मतदारसंघातील १०४ गावांसाठी १२५ कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. पैकी कायमस्वरुपी टंचाईग्रस्त असलेल्या तालुक्यातील एकमेव राहुड- वघाणेपाडा गावासाठी स्वतंत्रपणे १ कोटी ६५ लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. (Water problem of 104 villages in Baglan will solved 125 crore sanctioned under PM Jal Jeevan Mission scheme Nashik News)

येथील चिनार विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. भामरे बोलत होते. ते म्हणाले बागलाण तालुक्यातील केंद्राच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत १०४ गावांसाठी १२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन प्रत्यक्षात कामास सुरवात झाली आहे. बागलाण तालुक्यातील प्रत्येक गावात नळाला स्वच्छ पाणीपुरवठा झाला पाहिजे, यासाठी केंद्र शासनाकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचा पुरेपूर लाभ लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याला होत आहे. बागलाण तालुक्याचे आतापर्यंत जवळजवळ १०४ गावांना मिशन योजनेंतर्गत निधीचा लाभ झालेला आहे.

समाविष्ट गावे (कंसात रक्कम)

अंतापूर- १ कोटी ५१ लाख, भाक्षी- चार कोटी ९८ लाख, नवी शेमळी- १ कोटी २० लाख, कातरवेल- १ कोटी २ लाख, परशुराम नगर- ७१ लाख, बाभूळणे- ६० लाख, मुल्हेर- २ कोटी ११ लाख, तुंगणे दीगर- १ कोटी १ लाख, बोऱ्हाटे- ७७ लाख, देवठाण दिगर- १ कोटी ४ हजार, गौतम नगर- ६९ लाख ४१ हजार, भिलदर- ७७ लाख ४ हजार, जाड- ७३ लाख, आखतवाडे- २ कोटी १७ लाख, ताहाराबाद- ३ कोटी ७३ लाख, टेंभे (वरचे)- १ कोटी ९ हजार, टेंभे (खालचे)- १ कोटी ५ लाख, पिंपळदर- २ कोटी ९९ लाख, काकडगाव- ७० लाख ३५ हजार, जामोटी- ९४ लाख ३८ हजार, चौगाव- ४ कोटी १ लाख, जयपूर- ५२ लाख ३ हजार,

उत्राणे- ९८ लाख १० हजार, वाडीपिसोळ- ६० लाख ६१ हजार, एकलहरे- ७८ लाख ७२ हजार, पिंगळवाडे- ४६ लाख ९७ हजार, मुळाणे- ६० लाख २५ हजार, कठगड- ५४ लाख २८ हजार, कंधाणे- १ कोटी ३ लाख, रावेर- २९ लाख, फोपिर- ५४ लाख १४ हजार, भडाने- ५० लाख ८ हजार, अंबासन- ९२ लाख ३५ हजार, नवेगाव- ६२ लाख ९१ हजार, वनोली- १ कोटी ७ लाख, रातीर व रामतीर- ४ कोटी ९६ लाख, ढोलबारे- ५९ लाख ३ हजार, दरेगाव- ६३ लाख ८० हजार, मोहळांगी- १ कोटी ३ लाख, तिळवण- ४७ लाख ५ हजार, वाडीचौल्हेर- ४५ लाख ५२ हजार, सरवर- ५६ लाख २१ हजार, दसवेल- १ कोटी ४७ लाख,

हेही वाचा: Nashik : स्थगिती दिलेल्या 65 कोटींच्या कामांकडे डोळे; पालकमंत्र्यांना यादी मिळेना

लखमापूर- ४ कोटी ९७ लाख, मानूर- ३ कोटी ५३ लाख, साळवण- ९१ लाख ३१ हजार, वडेखुर्द- १ कोटी ५६ लाख, द्याने- १ कोटी २६ लाख, साकोडे- १ कोटी २७ लाख, जुनी शेमळी-१ कोटी ८८ लाख, आलियाबाद- १ कोटी ८६ लाख, माळीवाडे- १ कोटी ५४ लाख, गोळवाड- १ कोटी ९९ लाख, बोढरी- १ कोटी २३ लाख, मुंगसे- १ कोटी ४२ लाख, दऱ्हाणे- २ कोटी ३३ लाख, इंदिरानगर- १ कोटी २१ लाख, वडाखेल- १ कोटी २६ लाख, खरड- ७२ लाख ५४ हजार, अजदे- ५३ लाख ७७ हजार, कपालेश्‍वर- ९९ लाख ८ हजार, पठावे दिगर- १ कोटी ९२ लाख, वाघांबे- १ कोटी ८ लाख, ठेंगोडा- १ कोटी ३० लाख, ततानी-८८ लाख ८४ हजार,

नांदिन- १ कोटी ६८ लाख, दोधेश्‍वर- १ कोटी ९९ लाख, बहिराने- ७८ लाख ६३ हजार, सोमपूर- ९७ लाख २१ हजार, महड- १ कोटी ४६ लाख, मोराने सांडस- ४३ लाख ७४ हजार, राजपूरपांडे- ७६ लाख ९५ हजार, मुंजवाड- १ कोटी ८० लाख, तांदूळवाडी- ५२ लाख ९ हजार, वाठोडे- १ कोटी ९९ लाख, कुपखेडा- १ कोटी ९५ लाख, केरसाने- १ कोटी १० लाख, नवे निरपूर- ३३ लाख, पारनेर- १ कोटी ३९ लाख, भवाडे- ५८ लाख ५३ हजार, धांद्री- १ कोटी ७८ लाख, गांधीनगर- ३९ लाख ३ हजार, दगडपाडा- ८४ लाख ४२ हजार, दहिंदुले- ३४ लाख ३८ हजार, जुने निरपुर- ५८ लाख ३६ हजार, आव्हाटी- १ कोटी ९३ लाख, भुयाने- ५० लाख ४९ हजार,

बुंधाटे- १ कोटी १२ लाख, करंजाड- १ कोटी ९९ लाख, पिसोरे- ७२ लाख ९५ हजार, बिजोटे- १ कोटी १२ लाख, श्रीपूरवडे- ८७ लाख ८ हजार, तळवाडे दिगर- ७१ लाख ४९ हजार, खमताणे- ३० लाख ५१ हजार, बिजोरसे- ७७ लाख २७ हजार, मळगाव ति- ३१ लाख, इजमाने- १ कोटी २५ लाख, मळगाव खुर्द- ५७ लाख ४५ हजार, खामलोन- ९२ लाख १६ हजार, वटार ८३ लाख ४५ हजार, अजमेर सौंदाणे- १ कोटी ९२ लाख, देवपूर (चाफापाडा)- ७८ लाख ९९ हजार, चिराई- १ कोटी ४६ लाख, राहुड- वघानेपाडा- १ कोटी ६५ लाख, कोटबेल- १ कोटी ६९ लाख, कासारपाडा- १ कोटी २१ लाख.

हेही वाचा: Nashik Road Traffic : वाहतुकीचा प्रश्न ठरतोय डोकेदुखी; पोलिसांचे दुर्लक्ष