esakal | पाणीपट्टी वसुलीसाठी अपुऱ्या मनुष्यबळाअभावी नाशिक महापालिकेचा ॲप उतारा
sakal

बोलून बातमी शोधा

nashik muncipal corporation

नाशिक : नागरिकांनाच द्यावे लागणार पाण्याचे रीडिंग

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : पाणीपट्टीची वाढती थकबाकी, अपुरे मनुष्यबळामुळे ग्राहकांना वेळेत देयके पोचत नसल्याने महसुलावर होणारा परिणाम लक्षात घेता यापूर्वी विविध उपाययोजूनही फारसे यश हाती न लागल्याने अखेरीस महावितरण कंपनीच्या धर्तीवर पाण्याचे रीडिंग पालिकेच्या विविध कर विभागाकडे पोचविण्यासाठी ॲप निर्मिती केली जाणार आहे. पाणीपट्टी ग्राहकांनी ॲपच्या माध्यमातून रीडिंगचा फोटो काढून पाठविल्यानंतर व्हॉटस ॲपद्वारे ग्राहकांना देयके पोचणार आहे.

अपुऱ्या मनुष्यबळामुळे ही वेळ

शहरात दोन लाख १८ हजार नळजोडण्या असल्या तरी प्रत्येक ग्राहकाच्या हातात वार्षिक पाण्याचे देयके पडत नाही. ज्यांना देयके प्राप्त होतात, त्यात सरासरीनुसार दर आकारणी केली जाते. त्याला कारण म्हणजे महापालिकेच्या विविध कर विभागाकडे पाणी मीटर रीडिंग घेण्याबरोबरच देयके ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी अवघे ९८ कर्मचारी आहेत. त्यातील तीन कर्मचारी आज सेवानिवृत्त झाल्याने कर्मचारी संख्येत आणखी घट झाली आहे. पुढील सहा महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वाढणार असल्याने वसुलीवर परिणाम होणार आहे. सध्या सरासरी पद्धतीने पाण्याचे देयके दिली जातात. गेल्या एक ते दोन वर्षांपासून ग्राहकांना बिले मिळालेली नाहीत. पाणी मीटरवरून रीडिंग घेताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे सरासरी देयके दिली जातात. यामुळे पाणीपट्टी वसुलीवर मोठा परिणाम होत आहे.

हेही वाचा: Nashik : ‘स्मार्ट’ कामे गेली गोदावरीच्या पुरात वाहून

वार्षिक ७० ते ७५ कोटी रुपये पाणीपट्टीतून मिळणे अपेक्षित असताना देयके वेळेत हातात पोचत नसल्याने थकबाकी वाढत आहे. सध्या ११० कोटी रुपयांची थकबाकी आहे. महापालिकेकडून सवलत योजना राबवूनही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता महावितरण कंपनीच्या धर्तीवर मोबाईल ॲपची निर्मिती करून त्याद्वारे ग्राहकांनीच रीडिंगच फोटो अपलोड करून देयके प्राप्त करून घेता येणार आहे. येत्या दोन महिन्यात ॲप कार्यान्वित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: भुजबळ-कांदे वाद : दोघांना समन्स; पो.आ.पांडेंची गंभीर दखल

असे असेल ॲप

ज्या ग्राहकांना बिल मिळाले नसेल त्यांनी महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीच्या ॲपद्वारे मीटर रीडिंगच फोटो अपलोड केल्यावर पाणीपट्टी विभागाकडे त्याची नोंद होईल. ॲपवर ग्राहक क्रमांक, जिओ टॅगिंग सोय असल्याने ग्राहकांनी दिलेल्या व्हॉटस ॲप क्रमांकावर ग्राहकांकडे देयके पोचेल.

loading image
go to top